Posts

Showing posts from June, 2018

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- २२ जून

🙏🙏🙏२२ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   सुख त्यागात आहे, भोगात नाही. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही, म्हणजे दुःख होते.अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आपण विषयांत बुडतो आहोत, आणि पुनः विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो, आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही. परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुप्याचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे. आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे, आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे, असे जाणून, ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख, समाधान, सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- २१ जून

🙏🙏🙏२१ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्या देहाजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव 'हवा' असे वाटते खरे, पण 'हवाच' असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- जून २०

🙏🙏🙏जून २०🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥ माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥ आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते । आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते । म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥ शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥ नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥ आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥ आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥ ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥ परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥ शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥ मी कोण हे...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- १९ जून

🙏🙏🙏१९ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ 'मी कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक. पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ, देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यतः साठविलेले आहे. या दोन गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही. आता दुसर्याला पैसा द्यायचे म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केलाच पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी होईल; नंतर पैसे मिळविणे, आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसर्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल, आणि दुसर्याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा होणार की, दुसर्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणा मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसर्याचे काम तर नाहीच, आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले.  दुसरी ब...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- १८ जून

🙏🙏🙏१८ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ परमार्थात गुप्ततेची जरूरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे, म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायको नवर्यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना, आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे, याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते. समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवर्याजवळ हट्ट धरला, आणि नवर्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दार-खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१७ जून

🙏🙏🙏१७ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानीत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात. आणि त्याला 'हा व्यवहार आहे' असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही, तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली, त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही, त्याला बुवापणाही नाही करता येणार ! कर्ज फार झाले म्हणून प्रपंच मोडला, यात कोणता स्वार्थत्याग आहे ? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले, तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली. जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली, तर मग घरदारानेच काय केले होते ? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते ? हा प्रपंच,हा संसार, जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कोणाला तरी सुटेल काय ? जो आसक्तिच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा संसार, प्रपंच होता; पण त्यामध्य...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- १६ जून

🙏🙏🙏🙏१६ जून 🙏🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवत्प्राप्तीकरिताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले. 'भगवंता, आता नाही तुला विसरणार' असे कबूल करूनही, आपण जन्माला आलो नाही तर लगेच 'तू कोण ?' असे म्हणू लागलो ! संत आपल्याला 'तोच मी' असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुनः तोंडावरून पांघरूण ओढून घेतो, याला काय करावे ? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो; यात दोष गंगेचा का माझा ? 'गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करातात, पूजाअर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे ?' असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणला, 'याचे प्रत्यंतर समोरच दाखवितो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा माणूस पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल.' असे समजल्यावर जो तो हळूह...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने 卐॥ भाग-१५ जून

🙏🙏🙏१५ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ 'मी फक्त एका नामातच आहे.' मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापीही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही; तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण 'सर्व ठिकाणी मी आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदे जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही; शिवाय, साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने, संतांच्या अंतःकरणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सत...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१४जून

🙏🙏🙏१४जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला ? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो.  बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील ? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. 'राम कर्ता' असे म्हणावे. म्हणजे, देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही, किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा, आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते.  परमार्थ करणार्या माणसान...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१३ जून

🙏🙏🙏१३ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   प्रपंच हे परमार्थाचे साधन.  फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते; हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर, परमार्थाला दुसर्‍याची गरजच नाही; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या, हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी, किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळा सारखाच. गरीबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकार्‍याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपु...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१२ जून

🙏🙏🙏१२ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे.  काही न करणे, अर्थात् मनाने, हा खरा परमार्थ होय.  परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर 'मी' सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक, मनुष्यप्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने 'मी' आणि 'परमात्मा' अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-११ जून

🙏🙏🙏११ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे, परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो, तर दुसर्‍याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसर्‍याला संतती, संपत्ति वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत, सुखदुःखे कोणाला सुटत नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या, तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनःस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता, पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा, औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१० जून

🙏🙏🙏१० जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥  'असे झाले असते तर बरे झाले असते' । हे म्हणणे नाही खरे ॥ जे होणे योग्य ते घडले । व ते राम‍इच्छेनेच घडले ॥ परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले । हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥ माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥ आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥ परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥ न पडावे अभिमानाला बळी । राम‍इच्छा जाणावी सगळी ॥ हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥ आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥ म्हणून, होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥ चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥ ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥ माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥ आपण होऊन रामाचे जाण । स...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग - ९ जून

🙏🙏🙏९ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम  समर्थ ॥    वासनानाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ति म्हणजे काय, किंवा परमार्थ कशाला म्हणतात, हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ति नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा, विषयांचा आला पाहिजे. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 'जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिति' अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर, भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावे ? माझे समाधान माझ्याजवळ असताना, दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही; हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच; ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-८ जून

🙏🙏🙏८ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात, त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल. आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे 'सर्वस्व' अर्पण करणे, याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण, हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो ? छेः; भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो; परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो.  खरे म्हणजे, परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी; पण उद्या जर उपास पडला, तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे, त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयांत घालवू लागलो, आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली, तर मग लग्...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- ७ जून

🙏🙏🙏७ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   नित्यनेम म्हणजे काय ?  नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नेम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे, हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे देहाने, नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून, देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे.  इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे, वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-६जून

🙏🙏🙏६जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले, तरी त्याच्याखाली पाणीच असते.  असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो.  जन्माच्या वेळेस 'सोऽहं' म्हणत होता, नंतर 'कोऽहं' म्हणू लागला आणि शेवटी 'देहच मी' म्हणू लागला ! वास्तविक, सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे 'भगवंत' आणि 'मी' वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. 'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे; आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. 'जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे' असे वाटणे, यालाच निष्काम...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-५ जून

🙏🙏🙏५ जून🙏🙏🙏  ॥ श्रीराम समर्थ ॥   वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरणशुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकरयेईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून ज...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- ४ जून

🙏🙏🙏४ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ परमार्थात अभिमान आड येतो. शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्याला सद्गुरु म्हणतात.  जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही.  'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थनाही साधणार. ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- ३जून

🙏🙏🙏३जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ परमार्थ कसा साधेल ? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली, त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंताला शरण कसे जाता येईल ? आपण संतांच्या दर्शनाला जातो, आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो; मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का ?  पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची, श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले ! विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते; तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते ! माणूस व्यसनाकरतां हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले, तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.  चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-२ जून

🙏🙏🙏२ जून🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंतावर अकारण प्रेम करावे.  🌺🌻 खरोखर, जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय ,परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे; म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निःस्वार्थी राहील. ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१ जून

🙏🙏🙏१ जून 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध; पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले, तो मुक्त समजावा. 'देही मी नव्हे' हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्यज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदाने राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने 'मी देही' असे म्हणू लागलो आहे. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो, आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे घेतो. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल, तो मुक्त समजावा. कर्तेपण घातुक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो ! म्हणजे कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्य...