Posts

Showing posts from October, 2018

योग व प्राणायाम

*योग व प्राणायाम* प्राणायामाबद्दल... श्वास आणि प्राणायाम  बद्दल जास्तीत जास्त [परिपूर्ण नव्हे] माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो योग प्राणायाम हाच जीवनाचा आधार आहे .शरीरातील सर्व आजार अौषध, गोळ्या न घेता डोकेदुखी पासुन ते कँन्सर पर्यंत चे सर्व रोग आपण या द्वारे घालवू शकतो ऐकदा प्रशिक्षित योगशिक्षिका च्या मार्गदर्शनाखालीच शिकून घेवून आपण घरी करु शकतो.  *योगा केल्यानं जीवनात आनंद* आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्धदेखील झाले आहे. उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अँलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर...

कसे करावे ओम् उच्चारण?

*"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.* ------------------------------------------------- रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.  *कसे करावे ओम् उच्चारण?* ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल. ------------------------------------------------- *ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :* -------------------------------------------------- १)मानवी मनाची शुद्धता करणे. २)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे. ३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे. ४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे. ५)ओम् कार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी ...