卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१९ मे
🙏🙏🙏१९ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडाभाग तासून नंतर एकमेकात बसवितात, आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे, प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्परप्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भितीचा धाक असू नये. जसेआई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तनठेवावे. असा नियम आहे की, ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले, तो भजनामध्ये नाचत असतानात्याचा स्पर्श दुसर्याला झाला, की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे; ते ज्यालालाभेल तो भाग्याचा खरा !एक भगवंताचे प्रेम लागले, की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा, त्य...


Comments