卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१६ मे

🙏🙏🙏१६. मे🙏🙏🙏
॥ श्रीराम  समर्थ ॥

देह हा परमार्थाचे साधन समजावा.

संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे हे नव्हे.
 जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते.
विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही.
कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्याकरिता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला अणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे.
आतल्या खोबर्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य 'हा देहच मी आहे' असे मानून व्यवहार करतो.
वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोतअसे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन,फार काय माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र 'मी तोच आहे' असे समजून.
देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे.आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी, दुसर्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते.
देवावर प्रेम करायला, देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून, आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्‌गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल, तसतसे आपणस्वतःला विसरून जातो; आणि आपण देहाच्या पलिकडे गेलो, म्हणजे सद्‌गुरूचे खरे स्वरूपहे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्‌गुरूची ओळख होईल.
ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो.
 'मी देह' म्हणावे, यापलिकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही.
प्रपंचात संकटे येतात, तरी पण तो सोडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती कोणती ?
अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला, म्हणजे देहाचे ममत्व थोडे कमी होते.
देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे होऊ.

🏵🌿 १३७. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.
  🌿🏵️

Comments

Popular attention seeker posts

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१९ मे

कसे करावे ओम् उच्चारण?

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-११ जून

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- १९ जून

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-५ जून