Posts

Showing posts from May, 2018

Peru Methamba ( Guava chatny ) - पेरुचा मेथांबा

Image
Peru Methamba ( Guava chatny) पेरुचा मेथांबा पेरुचा मेथांबा Ingredients :    Guava (अमरूद/पेरू)      2 small   Oil (तेल)          2 Tb-sp   Mustard  seeds(राई/मोहरी)       1  Tsp    Cumin seeds (जीरा)       1  Tsp    Fenugreek seeds (मेथी दाना)       1  Tsp    Turmeric powder (हल्दी/हळद)       1/2  Tsp   Red Chilly powder (लाल मीर्च/तिखट)      1  Tsp  Garam masala powder  (गरम मसाला)     1/2 Tsp     Jaggery (गुड़/गूळ)      2  Tb-sp        [  Substitute - Sugar  ]    Salt (नमक/मीठ)       1 Tsp    Water (पानी/पाणी)       1/4 Cup Preparation  : Chop the Guava into small pieces or cubes, set asi...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-३१ मे

🙏🙏🙏३१ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंताला शरण जावे.  मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो. मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू ?  मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तो पर्यंत सगुणभक्ति करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-३० मे

🙏🙏🙏३० मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा.  अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग ॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥ परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥ गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥ जेथे जेथे जावे । चटका लावून यावे ॥ याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ देहाचे दुःख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ अभिमान नसावा तिळभरी । निर्भय असावे अंतरी ॥ जे दुःख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥ देह टाकावा प्रारब्धावर । आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥ प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावा रघुनाथा ॥ आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥ दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥ कोणास न लावावा धक्का । हाच नेम तुम्ही राखा ॥ एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्‌भाव धरी ॥ ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-२९मे

🙏🙏🙏२९मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार, असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर, मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात; मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे 'मी रामाला विसरलो' हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो; पण भगवंत चोहोकडे पाहतो आहे अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला, तर त्या सं...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- २८ मे

🙏🙏🙏२८ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ प्रपंच भगवंताचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता,परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळहे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.' देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -२७ मे

🙏🙏🙏२७ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय ? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसर्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेस...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -२६ मे

🙏🙏🙏२६ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंताचे स्मरण ही सद्‍बुद्धी.  परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून, बुद्धीदाता...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -२५ मे

🙏🙏🙏२५ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामधे कसे हसूनखेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की, ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ति कितीही दिली तरी पुरे पडत नाही. पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळविणे हे सोपे आहे. पण हे समजून, आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे. पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का ? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना, स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. परंतु तो हाडूक काही सोडीत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणत...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- १३ मे

🙏🙏🙏१३ मे🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ स्वतःला सुधारण्याचा प्रयत्‍न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने, मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे; पण ते मिळविण्याकरता साधन, म्हणजे प्रयत्‍न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन, एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे; दोन, मागच्या बर्‍यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तीन, उद्याची काळजी लागणे. आता, जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी, आपली इच्छाच नाहीशी करावी; अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू; हाव सोडावी, लोकांची आस सोडावी; जे काही होते ते 'रामाच्या इच्छेने झाले' म्हणावे. प्रत्येक गोष्ट 'रामाने केली' म्हणणे, म्हणजे अखंड भगवंताच्या अनु...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -२४ मे

🙏🙏🙏२४ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥  नाम प्राणाबरोबर सांभाळावे . आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का ? जे करण्याने देवाची प्राप्ती होते, ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल ? तुम्ही अभ्यास करता; अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे; चांगले धट्टेकट्टे पाय आहेत; ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत, तर पाय नसलेले काय वाईट ? तुमच्यापुढे ब्रह्मानंदबुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता ? त्यांनी काय केले पाहा! त्यांनी नामस्मरणरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी, जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसांत तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायलाकारण होतो; तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झालीतर आपले पापच आड येते असे समजा; आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाब...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- २३ मे

🙏🙏🙏२३ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ देवाकरिता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची  बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; तेखरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल.  संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम,...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग- २२ मे

🙏🙏🙏२२ मे 🙏🙏🙏 श्रीराम समर्थ  गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून, झगडून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; पण तुम्ही त्यांना भिता याला काय करावे ? अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणज...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग - २१मे

🙏🙏🙏२१ मे 🙏🙏🙏 श्रीराम समर्थ अट्टाहासाने नामस्मरण करावे.  नामाइतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे 'अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो' असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच अहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू, याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात, म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण, निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का ? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचासुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गो...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -२० मे

🙏🙏🙏२० मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥  भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण । स्मरणांतून गेला रघुनंदन ॥ सर्व दुःखाचे मूळ । भगवंतापासून झालो दूर ॥ रामावाचून प्रपंचात नाही सुख । कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख ॥ कोळशाने हात काळा झाला । त्याने दुःखी कष्टी झाला ।ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला । आपण मात्र नाही ओळखला ।तैसा प्रपंच दुःखाचा झाला । भगवंतावाचून वाया गेला॥ जगातील ऐश्वर्य,मानाची प्राप्ति । रामरायाविण समाधानाला न देती ॥ जे जे वैभव जगती । ते ते आले हाती ॥ वाया सर्व जाते । हाती न येता रघुपति ॥ परमात्म्याचे विस्मरण । हेच बीज जाणावे मूळ कारण ॥ काळजी, चिंता, अहंकार । भिती, तळमळ फार। हा झाला त्याचाच विस्तार ॥ तात्पर्य, कडू बी पेरले । त्याचे गोड फळ नाही आले ॥ काळजी आणि भिती । भगवंताच्या विस्मृतीत जन्मती ॥ म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानि । परमात्म्याला दूरच करतील दोन्ही ॥ व्यवहार, सद्वासना, सदाचरण । लौकिक, संतति, संपत्ति, शास्त्राचे मनन ।सर्व काही वाटे रामाविण शून्य ॥  संतति, संपत्ति, लौकिकाची प्राप्ति ।सर्व वैभव जरी आले हाती । तरी रामाविण आहे फजिती...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१९ मे

🙏🙏🙏१९ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडाभाग तासून नंतर एकमेकात बसवितात, आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे, प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्परप्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भितीचा धाक असू नये. जसेआई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तनठेवावे. असा नियम आहे की, ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले, तो भजनामध्ये नाचत असतानात्याचा स्पर्श दुसर्याला झाला, की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे; ते ज्यालालाभेल तो भाग्याचा खरा !एक भगवंताचे प्रेम लागले, की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा, त्य...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१८ मे

🙏🙏🙏१८ मे🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो,या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते ते पाहावे. भगवद्‌भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणार्याची. तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळ खेळू लागाला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला, तर कसे होणार ? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्यासारखी वाटू लागली ! वास्तविक, दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही; पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे ? 'मी सुखी कशाने होईन' हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का ? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो, त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते. बाक...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१७मे

🙏🙏🙏१७ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥   मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण 'देव आहे' असे मानतो,पण आपला तो खरा विश्वास आहे का ? एकादा मनुष्य बुडायला लागला, म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो, आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, 'देव आहे' असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देवपुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे, परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक, परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे, तसा दुसर्यातही आहे; म्हणून दुसर्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही.  तरी अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठिराखा...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१६ मे

🙏🙏🙏१६. मे🙏🙏🙏 ॥ श्रीराम  समर्थ ॥ देह हा परमार्थाचे साधन समजावा . संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे हे नव्हे.  जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्याकरिता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला अणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबर्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य 'हा देहच मी आहे' असे मानून व्यवहार करतो. वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोतअसे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन,फार काय माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र 'मी तोच आहे' असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे.आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठ...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१५ मे

🙏🙏🙏१५ मे  🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग, खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तर्हेने देहाला दुखापत केली, तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील; पण मन दुखविण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे; कारण, भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांत 'मी मन आहे' असे सांगितले आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य असे म्हणाला की, मी एक सत्य तेवढेच जाणतो, आण...

卐॥श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग -१४मे

🙏🙏🙏१४ मे 🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण रामाचे झालोम्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच, एकाची आसक्ति ठेवल्याने दुसर्याची विरक्ति येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जातो ना ? मग साधनेच्या वेळी बायकोमुले आड येतात हे कारण का सांगावे ? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात; असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतोआणि घरही जाळता येते; त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एकजण मला म्हणाला की, "मला प्रपंच टाकावासा वाटतो." मी त्याला म्हटले, "नुसता प्रपंच टाकण्याने तुलावैराग्य कसे येईल ? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. "चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे? वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म अभिमानाने ज्याला त्याल...

卐॥ श्री ब्राम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-९ मे

🙏🙏🙏🙏 ९ मे 🙏🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ 🌸🌼 शुद्ध वातावरण व पवित्र आचरण.🌼🌸 आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असतानातुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वे...

卐॥ श्री ब्राम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१० मे

🙏🙏🙏१० मे🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ देहमनाने व्हावे समर्पण । भगवंताची उपासना । दूर करी सर्व यातना ॥ चित्ताची स्थिरता । भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥ देह जरी जीर्ण फार । तरी वासनेचा जोर अनिवार । हे जाणून चित्ती । एक भजावा रघुपति ॥ हृदयी करता भगवंताचे ध्यान । नामाविण उच्चार दुजा न जाण । त्यात व्यवहाराचे जतन । न दुखवावे कोणाचे अंतःकरण । असा नेम ज्याच्यापाशी । राम तेथील रहिवाशी ॥ मी रामाचा, रामा तू माझा । हाच अखंड असावा हव्यास ॥ ऐसे ध्यावे रामाला । की जे जीव प्यार झाले मला ॥ आता याहून दुजे न सांगणे काही । रामाविण जगू नाही ॥ जे जे होणार ते होतच जाते । ते भगवंताच्या इच्छेने घडते । ऐसे आणणे मना । याचे नाव उपासना ॥ अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माऊली ॥ स्वार्थरहित रामसेवा । याहून लाभ दुजा न जीवा ॥ राम ठेवा मनी । तो ध्यात जावा मानसपूजनी ॥ वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंताची सेवा । चित्ती भगवंताचे ध्यान । आपण राहावे रामार्पण । याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥ उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अट ॥ उपासनेचा असावा जोर । ज्याने होईल म...

卐 ॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥ 卐 भाग-११ मे

🙏🙏🙏🙏११ मे🙏🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ थोडे वाचावे पण कृतीत आणावे. खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा पुष्कळ लोकांचा हव्यास असतो, आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणार्‍याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते, आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाचे असेच आहे; म्हणून थोडेच वाचून, समजून घ्यावे, आणि ते कृतीत आणावे. नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो, आणि कृति न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस-तीस मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल, आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये. थोडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून के...

卐॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥卐 भाग-१२ मे

🙏🙏🙏🙏१२ मे🙏🙏🙏🙏 ॥श्रीराम समर्थ ॥ कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसर्‍याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसर्‍याला फसविण्याकरिता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये, आणि देहाने परपीडा करू नये. दुसर्‍याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसर्‍याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन, संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करावा. ...

Homemade Diwali lantern (Akash-kandil)

Image
Homemade Diwali lantern.

卐 ॥ श्री ब्रम्हचैतन्य महाराज प्रवचने ॥ 卐 भाग - ८ मे

🙏🙏🙏🙏 ८ मे 🙏🙏🙏🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥ 🌺🍀 भगवंताचे अनुसंधान राखावे .🍀🌺 फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुनः पुनः फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे, आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असलो की प्रपंचात मजा आहे; अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणार्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडातिकडा पोहेल, तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल.  कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भिती वाटत नाही. विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता, ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त...